Pune Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली, वाचा ताजी आकडेवारी

Pune Dam Water Level Today Update: गेल्या वर्षी याच दिवशी चार धरणं मिळून ८१.२२ टक्के पाणीसाठा जमा होता. यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ९ टक्के जास्त पाणीसाठा या चारही धरणात आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्याकरांचे पाण्याचे टेन्शन आता पूर्णपणे मिटली आहे. पुणे शहराला (Pune City) पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पुणे शहरावरील पाणीसंकट टळलं असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. पण जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील (Pune Dam Water Level) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणात २६.४६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चार धरणं मिळून ८१.२२ टक्के पाणीसाठा जमा होता. यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ९ टक्के जास्त पाणीसाठा या चारही धरणात आहे. सध्या पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणांमध्ये एकूण ९०.७६ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

खडकवासला धरणातून सध्या ११४०७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे.पुण्यातील नदी पात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्याचसोबत नदाकाठावर राहणाऱ्या पुणेकरांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

- खडकवासला - ७२.८३ टक्के

- पानशेत - ९०.७२ टक्के

- वरसगाव - ९२.८२ टक्के

- टेमघर - ९३.२८ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT