अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने धरणाने तळ गाठला आहे. यामुळे सध्या गिरणा धरणात केवळ १५.२२ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक राहिला आहे. आगामी दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर गिरणा धरण परिसरात पाण्याची समस्या जाणविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गिरणा नदीचे उगमस्थान तसेच नाशिकजवळ असलेल्या (Girna Dam) गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात देखील पावसाळा सुरु झाल्यानंतर म्हणजे जून महिन्यात सुरवातीला पाऊस झाला होता. यानंतर मागील दीड महिन्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. यामुळे धरणात देखील पाण्याची आवक झालेली नाही. शिवाय गिरणा धरण मोठे असल्याने याची पाण्याची क्षमता देखील अधिक असल्याने धरणातुन पाणी लवकर सुटत नसल्याने पुढे (Girna River) नदीला देखील पूर येत नाही. यंदा तर पाण्याची आवकच नसल्याने धरण व नदी काठच्या गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्मेच साठा
मागील वर्षी जुलैअखेर धरणात ३१.८८ टक्के जलसाठा होता. मात्र यंदा तो निम्म्या पेक्षा कमी असल्याने (Nashik) नाशिकच्या मालेगावसह खानदेश मधिल नागरीकांची चिंता वाढली आहे. या धरणावर अनेक पाणी योजना अवलंबून असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या गंभीर होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.