pune news
pune news  saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील 'सेक्स तंत्र' आयोजकांवर गुन्हा दाखल; सामच्या बातमीचा इम्पॅक्ट

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune News : पुणे (Pune) शहरातील लैंगिक प्रशिक्षणाची जाहिरात प्रचंड व्हायरल झाली होती. या जाहिरातीत लैंगिक प्रशिक्षणाचं तीन दिवसाचं शिबीर घेण्यात येणार असल्याचा मजकूर लिहिण्यात आला होता. या जाहिरातीवर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या शिबीराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर लैंगिक प्रशिक्षण शिबीर आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र, त्याआधीच पुणे (Pune) शहरातून काल एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुण्यात नवरात्र उत्सावाच्या (Navratri Festival) निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिबीराविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

सोशल मीडियावर देखील या शिबीराच्या विरोधात वातावरण तापलं होतं. अखेर सेक्स तंत्र शिबीराच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामच्या बातमीनंतर उत्तर प्रदेशातील रवी सिंग नावाच्या इसमावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रवी सिंग हा पुण्यात नवरात्रीच्या काळात सेक्स तंत्र शिबीर घेणार होता. मात्र, त्याआधीच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

योग, आयुर्वेदाविरोधात षडयंत्र रचलं जातंय; बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप

योग, आयुर्वेद आणि स्वदेशी विरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय, योगाला बदनाम करण्यासाठी धार्मिक दहशतवाद कारणीभूत आहे. पतंजली आणि योगविरोधात उत्तराखंड मधून षडयंत्र सुरू केलं गेलं ज्याचा आम्ही पर्दाफाश केला, असा खुलासा करत बाबा रामदेव यांनी पत्रकारपरिषदेत गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले बाबा रामदेव?

योग गुरु बाबा रामदेव यांनी आज मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. योगाच्या बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पतंजलिने आतापर्यंत लाखो लोकांना रोजगार दिला. मात्र, आता काही लोक योग, आयुर्वेद आणि स्वदेशी विरोधात षडयंत्र रचत आहे. या षडयंत्राला उत्तराखंडमधून सुरूवात झाली आहे. असा आरोप बाबा रामदेव यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Jalana News: ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव... जोरदार घोषणाबाजी; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT