Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: भवानी पेठेत 2015 पासून पाकिस्तानी तरुणाचे बेकायदेशीर वास्तव्य, पोलिसांनी घेतले ताब्यात, बनावट पारपत्र जप्त

Pune Latest News: त्याने पुणे ते दुबई प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime News: पुण्यामध्ये बेकायदेशीर रित्या पाकिस्तानी तरुण वास्तव्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या तरुणाचे नाव असून भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ तो राहात होता अशी माहिती मिळाली आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. (Pune News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद अमान अन्सारी हा पाकिस्तानी तरुण शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. या माहितीवरुन भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले. अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवले आहे

अन्सारीने बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अन्सारीचा बेकायदा वास्तव्य करण्यामागचा हेतू काय होता, तसेच तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत. (Latest Marathi News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

वकिलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT