Pune Water Supply News  saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेकडून आले नवे अपडेट

Chandrakant Jagtap

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शहरातील काही भागात बुधवारी आणि गुरूवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. पुणे महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेमध्ये टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे.

त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. ज्या भागातील पाणी बंद आहे, तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

बुधवारी या भागात बंद असेल पाणी

सणस पंपिग स्टेशन : नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली क्रमांक. बी १० ते बी १४ या भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. (Pune Latest news)

गुरुवारी या भागात येणार नाही पाणी

चतु:शृंगी टाकी परिसर : बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनिशन फॅक्‍टरी, अभिमानश्री सोसायटी.

एसएनडीटी टाकी परिसर : शिवाजीनगर, भोसलेनगर, चोले रोड, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाइन, गोखलेनगर, भांडारकर रोड आणि परिसर. (Latest Marathi News)

पद्मावती टाकी परिसर : बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र : ससाणेनगर, काळेबोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT