Koyata Gang Saam TV
मुंबई/पुणे

Koyta Gang: कोयता गँगचा करेक्ट कार्यक्रम होणार, पोलिस महासंचालकांची मोठी घोषणा

कोयता गँग तसेच कोयता घेऊन दहशत निर्माण करण्यारांविरोधत एक नवीन पथक तयार करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात  कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयदा गँगने दहशत माजवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मात्र आता या कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

कोयता गँग तसेच कोयता घेऊन दहशत निर्माण करण्यारांविरोधत एक नवीन पथक तयार करण्यात येणार आहे. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी याबाबत घोषणा केली आहे.  (Latest Marathi News)

कोयता गँगची दहशत पुण्यासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त यांनी दखल घेतली आहे. कोयता गँग विरोधात एक नवीन पथक तयार करण्यात येणार. हे गुन्हे कसे कमी होतील यासाठी प्रयत्नशील आहोत, असं रजनीश शेठ यांनी म्हटलं आहे.

कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशानस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास 105 कोयते जप्त केले होते.

अजित पवारांनी विधानसभेत कारवाईची मागणी

कोयता गँगचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात देखील उपस्थित केला होता. नागरिकांमध्ये कोयता गँगची दहशत आहे. या गँगवर मकोका लावावा, आरोपींना तडीपार करावे. कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करा, अशी मागणी अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मोठी बातमी! मुंबईत सीनीएजीचे दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

SCROLL FOR NEXT