Pune Crime News : पुण्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या कोयता गँगचा धुडगूस, यांना आवरणार कोण?

पुण्यात पुन्हा एकदा तरुणांनी हातात कोयते नाचवून दहशत माजवली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगविरोधात पोलिसांनी धडक कारवाई मोहीम सुरू केलेली असतानाच, पुण्यात पुन्हा एकदा तरुणांनी हातात कोयते नाचवून दहशत माजवली आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. (Latest Marathi News)

Pune Crime News
माझ्याकडे ऑडी कार आहे... पत्ता विचारल्याच्या रागातून अंगावर घातली गाडी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील काही भागांत गुंडांनी हैदोस घातलाय. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणं कठीण झालंय. दिवसाढवळ्या हाणामारी, खून अशा गंभीर घटना घडताहेत. काही दिवसांपूर्वी कोयता हातात घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या तरुणाला गस्तीवरच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडलं होतं. त्याला तिथंच अद्दल घडवली होती. कठोर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले होते. मात्र, तरीही कोयता गँगची दहशत कायम आहे.

पुण्यात पुन्हा एकदा कोयते हातात घेऊन काही तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते नाचवून काही तरुणांनी दहशत माजवली. दरम्यान, दहशत पसरवणाऱ्या या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहेत.

या टोळक्याकडून चार कोयते आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. रणजीत रघुनाथ रामगुडे, रोहन गोरख सरक, विशाल शंकर सिंह, आदित्य राजेश वडसकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

Pune Crime News
Pune Crime News: कोयता गँगचा करेक्ट कार्यक्रम; जिथे दहशत माजवली, त्याच रस्त्यावरून धिंड काढली

पोलीस आयुक्तांनी कोयता गँगवर कारवाईचे दिले होते आदेश

काही दिवसांपूर्वीच पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगवर कारवाईचे आदेश दिले होते. शहरात कोयते दाखवून दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत गुन्हेगारांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कोयता हातात घेऊन जर कोणी दहशत निर्माण करत असेल तर कारवाई केली जाणार, असे त्यांनी सांगितले होते. लहान मुलांचा यामध्ये समावेश असेल तर समुपदेशन केले जाणार आहे. मात्र कारवाई करा, अशा सूचना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com