VIDEO: पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; हॉटेल बाहेर राडा, थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर कोयता गॅंगने राडा घातलाय.
Koyata Gang
Koyata GangSaam TV
Published On

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यात गेले काही महिन्यापासून कोयता गँगची दहशत हडपसर, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत माजवली होती. गेल्या आठवड्यामध्ये सिंहगड रोड परिसरात कोयात्याने दहशत वाजवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी भर रस्त्यात चोप दिल्यानंतर काहीशी कोयता गँग शांत होती.

मात्र आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केली आहे. सिंहगड रोड भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना पकडून त्या भागात धिंड काढली होती. त्यामुळे आता परत एकदा कोयता गँग दहशत घालत आहे.  (Mumbai Crime)

Koyata Gang
Mumbai News: संतापजनक! वर्गात कुणी नसताना शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य, आरोपी शिक्षकाला बेड्या

पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर कोयता गॅंगने राडा घातलाय. पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केल्याचं दिसत आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत की, हॉटेल मालकाला धमकी देत हॉटेल बंद करण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवला जात आहे. पाच ते सहा जणांना हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालकाला धमकावलं. त्यानंतर बाहेर येत तिथे असलेल्या खुर्च्या देखील फेकल्या. त्यामुळे पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांसमोर कोयता गँग बिमोड करणे प्रश्न असणार आहे.

Koyata Gang
Pune Crime: परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा, पुण्यातील व्यक्तीची फसवणूक

अजित पवारांनी विधानसभेत कारवाईची मागणी

कोयता गँगचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात देखील उपस्थित केला होता. नागरिकांमध्ये कोयता गँगची दहशत आहे. या गँगवर मकोका लावावा, आरोपींना तडीपार करावे. कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करा, अशी मागणी अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com