Lavasa Sold Saamtv
मुंबई/पुणे

Lavasa Sold: देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन 'लवासा'ची विक्री! तब्बल १८१४ कोटींची डील; खरेदीदारांना 5 वर्षांत मिळणार घरे

Lavasa Hill City News: लवादाने दिलेल्या २५ पानांच्या आदेशात १८१४ रुपयांच्या गुंतवणुकीच्या योजनेला मंजुरी दिली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Lavasa Hill Station News: नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासा डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या विक्रीस मान्यता दिली आहे. डार्विनने सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनला कंपनीच्या कर्जदात्यांनी मंजूरी दिल्यानंतर एनसीएलटीने खरेदी प्रक्रियेचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या जवळ असलेल्या लवासावर डार्विन प्लॅटफाॅर्म इन्फ्रास्ट्रक्चरचा मालकी हक्क असणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या (Pune) मुळशी तालुक्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प हा देशातील पहिला खासगी हिल स्टेशन प्रकल्प होता. मुंबईतील (Mumbai) डार्विन ग्रुपने लवासा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तब्बल 1,814 कोटी रुपयांमध्ये ही खरेदी होणार आहे.

हा प्रकल्प दिवाळखोरीत असल्यामुळे त्यास एनसीएलटीची मंजुरी हवी होती. अखेरी त्याला मान्यता दिल्याचे आदेश एनसीएलटीचा मुंबई खंडपीठाने काढले आहेत. लवादाने शुक्रवारी दिलेल्या २५ पानांच्या आदेशात या योजनेला मंजुरी दिली.

असा आहे प्रकल्प...

मुळशी (Mulshi) तालुक्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी १२ हजार ५०० एकर जमिनी घेतली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी अजून ८ ते १० वर्षे लागू शकतात. या प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी ज्यांची रक्कम अडकली होती, त्यांनी आता भरपाई मिळणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाण्यात राष्ट्रवादीकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

SCROLL FOR NEXT