Beed News: उघड्या आभाळाखाली शेती करणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकार उघड पडू देणार नाही: मंत्री धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest News: उघड्या आभाळाखाली शेती करणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकार उघड पडू देणार नाही: मंत्री धनंजय मुंडे
Dhananjay Munde
Dhananjay Munde Saam Tv
Published On

Beed News: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीडच्या परळी तालुक्यात गोगलगायने बाधित क्षेत्राचा पाहणी दौरा केला. यावेळी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. कसलेही नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर आलं तरी या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. उघड्या आभाळाखाली शेती करणाऱ्या शेतकऱ्यांला राज्य सरकार उघडं पडू देणार नाही, असं म्हणत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय.

बीडच्या परळी तालुक्यातील वाघबेट गावात जाऊन धनंजय मुंडे यांनी शंखी गोगलगायने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच बांधावरूनच मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांना फोन लावून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

Dhananjay Munde
Ambadas Danave On Cm Eknath Shinde: 'ज्यांच्या मांडीला मांडी नको म्हणून बाहेर पडले, तेच मांडीवर येऊ बसले'; अंबादास दानवेंचा CM शिंदेंना टोला

कमी पाऊस असताना पण गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला. मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांना सांगून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कमी पाऊस असल्याने उत्पन्न कमी निघेल, अशी चिंता आहे. दुसरीकडे गोगलगायचं संकट हे सगळं पीक खाऊन टाकतात. त्यामुळे जेवढी मदत शेतकऱ्यांना करता येणार आहे. तेवढी करायचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले आहेत.

कृषी संदर्भातील तक्रारी संदर्भात अॅप तयार केला. लेखी स्वरूपात तक्रारी आल्यावर बोगस बियाणे, पीक विमा, बोगस खते, या संदर्भात कारवाई करू, असंही मंत्री मुंडे यावेळी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

Dhananjay Munde
Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडी दुर्घटनेचा चौथा दिवस! मृतांचा आकडा २९ वर, ७६ जण अद्यापही बेपत्ता

यासोबतच ज्या ठिकाणी अतिवृष्टी आणि जास्तीचा पाऊस झाला त्या ठिकाणचे पिके पाण्याखाली आहेत. पाण्याचा निचरा झाल्यावर कृषिमंत्री म्हणून मी पाहणी करण्यासाठी बांधावर जाणार आहे, असं मुंडे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com