pune navale bridge accident today Saam TV Marathi news
मुंबई/पुणे

Pune Navale Bridge: एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावणार ; नवले पूल अपघातनंतर सगळ्याच यंत्रणा एकवटल्या

Pune Accident Update: पुण्यातील नवले पुलावर गुरूवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. भरधाव कंटेनरने १७ वाहनांना धडक देत पेट घेतला होता. या अपघातचा तपास पुणे पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • नवले पूल अपघातानंतर प्रशासनाची महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे

  • अपघातात ८ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले

  • सेवा रस्ता, अतिक्रमण, रिंगरोड आणि सुरक्षा उपायांवर सविस्तर चर्चा होणार

  • ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरने १७ वाहनांना धडक दिली

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघाताप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नवले पूल अपघातानंतर पुण्यात सर्वच यंत्रणा एकवटल्या आहेत. नवले पुलाबाबत उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

पुणे पोलिस, पी एम आर डी ए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पी डब्ल्यू डी, पुणे महापालिका आणि आर टी ओ या विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील या बैठकीला उपस्थितीत राहणार आहे. सकाळी ११ वाजता पुण्यातील सर्किट हाऊस याठिकाणी बैठक होणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीत नवले पुलाजवळ असलेल्या सेवा रस्ता, रिंग रोड, अतिक्रमण, अपघात रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पुण्यातील नवले पुलावर गुरूवारी पावणे सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. ब्रिजवरून खाली उतर असताना कंटेनरचा ब्रेक फेल झाला. या भरधाव कंटेनरने १७ वाहनांना धडक दिली. त्यानंतर या कंटेनरने पेट घेतला. या अपघातामध्ये ८ निष्पाप नागरिकांचा मृ्त्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये १५ ते २० जण जखमी झाले. जखमींवर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघात प्रकरणी कंटेनर चालक, क्लीनर आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लीनरचा मृत्यू झाला. पोलिस सध्या ट्रक मालकाचा शोध घेत आहेत. हे सर्वजण राजस्थानचे होते. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पुण्यातील या नवले पुलावर अपघाताच्या मालिका सुरूच आहे. या पुलावर या आधी देखील अनेक अपघात झाले आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT