Traffic Changes in Pune City  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic Update : लाडक्या बहिणींसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, आज कोणकोणते रस्ते राहणार बंद?

Traffic Changes in Pune City : पुणे शहरातील बालेवाडी परिसरात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

Satish Daud

पुणे शहरातील बालेवाडी परिसरात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने बालेवाडी परिसरात वाहतूक वळवली आहे.

पुणे वाहतूक मार्गात मोठे बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम असल्याने बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील राधा चौक ते मुळा नदी पुलापर्यंतचे सर्व सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यावेळेत फक्त कार्यक्रमात सहभागी होणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांना बांतर भवन आणि बालेवाडीतील इतर परिसरात पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील रस्ते देखील बंद ठेवण्यात येणार आहे. आज शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीचे हे बदल लागू असतील.

पुण्यातील कोणकोणते रस्ते राहणार बंद?

पुण्यात लाडक्या बहि‍णींसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई-पुणे जुना महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग देखील बंद राहील.

त्याबरोबर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक देखील बंद ठेवण्यात येईल. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक देखील अवजड वाहनांसाठी बंद राहील. पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. कार्यक्रम आटोपल्यानंतर वाहतूक सुरळीत केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT