Pune MPSC Student Missing Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून घराबाहेर पडला; संभाजीनगरमधील MPSC चा विद्यार्थी 3 महिन्यांपासून बेपत्ता

Pune MPSC Student Missing: बुद्धभूषण पठारे असे या २४ वर्षीय बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात बुद्धभूषणच्या आई-वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये एमपीएससी करणारा विद्यार्थी गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयामध्ये नोकरी लागल्याचे पालकांना खोटे सांगून हा तरुण बेपत्ता झाला आहे. बुद्धभूषण पठारे असे या २४ वर्षीय बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात बुद्धभूषणच्या आई-वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण पठारे मूळचा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. पुण्यातील गांजवे चौक परिसरातील एका इमारतीत तो आपल्या मित्रांसोबत राहत होता. तसेच नवी पेठेतील एका अभ्यासिकेत तो अभ्यास करत होता.

अचानक मे महिन्यात त्याने आपल्या आई-वडिलांना मंत्रालयात नोकरी मिळाली असल्याचे सांगितले. मुलाला नोकरी लागल्याचे ऐकून त्याच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आणि भेटण्यासाठी त्याच्या पालकांनी मुंबई गाठली खरी. पण तिथे गेल्यावर त्यांना आपला मुलगाच भेटला नाही. त्याचा मोबाईल बंद लागला. यानंतर त्याच्या वडिलांनी पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

काही दिवसांपूर्वी मात्र अचानक त्याच्या मोबाईलवरून त्याच्या पालकांना एक व्हॉट्सॲप मेसेज करण्यात आला होता. ज्यामध्ये मी सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असा उल्लेख केला आहे. यामुळे बुद्धभूषण पठारे नेमका गेला कुठे?, कोणाच्या संपर्कात तो आहे का? त्याचे कोणाशी काही वाद झाले का? याच बरोबर त्याच्याशी कोणी आर्थिक व्यवहार केले का? असा संशय पोलिसांना आहे. पोलिस या सर्व बाजूने तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातील पालिकेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना घडली. घोले रोडवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात आगीची घटना घडली. वस्तीगृहाच्या जिन्या शेजारी असलेल्या विद्युत मीटरला ही आग लागली. आज सकाळी आगीची ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT