Bhimashankar Temple Mobile Ban Saam TV
मुंबई/पुणे

Bhimashankar Temple News: भाविकांनो, भीमाशंकरला दर्शनासाठी जाताय? मंदिर प्रशासनाने घातली 'या' गोष्टीवर बंदी

Bhimashankar Temple Mobile Ban: भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मंदिर प्रशासनाने या गोष्टीवर बंद घातली आहे.

रोहिदास गाडगेखेड

Bhimashankar Temple Mobile Ban: सध्या अधिकमास सुरू असल्याने तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यातच १५ दिवसांत श्रावण सुरू होणार असल्याने ही गर्दी अधिकच वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या भीमाशंकर मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. अशातच भीमाशंकर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

भीमाशंकर (Bhimashankar) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते मंदिर परिसरात मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भीमाशंकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात. श्रावण महिन्यात (Shravan Month) दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गर्दीत अनेक अनुचित प्रकार घडत असतात.

या संपूर्ण गोष्टींचा त्रास मंदिर प्रशासनाला सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी (Mobile Ban) घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल वापरता येणार नाही.

भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात फोटो काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

Karnataka Politics : सत्तासंघर्ष पेटला! मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? कर्नाटकात 'डीके बॉस'!

Maharashtra Live News Update : देवळीतील भाजपाची विजय संकल्प सभा

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT