Boy Death While Playing Cricket Yandex
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Boy Death While Playing Cricket: क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातून समोर आली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाला (Pune News) आहे. ही घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे, असं मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. परिसरामध्ये या मुलाच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शंभुच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अशा घटना घडू शकतात, त्यामुळे खेळताना काळजी घेणं गरजेचं असतं.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे. शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत (Boy Death While Playing Cricket) होता. मित्रांसोबत खेळता खेळता अचानक समोरून येणारा बॉल शंभुच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला.

काही वेळानंतर तो उठून उभा राहिला. मात्र , वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल (Boy Death Due To Ball Hit) केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आलं आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

क्रिकेट (Cricket) खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यामधून समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे लहान मुलं बाहेर खेळायला जातात. तेव्हा त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवणं तसंच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा असे अपघाताचे कारण समोर येत आहेत. खेळताना बॉल लागल्यामुळे चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. शंभूच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT