Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: अर्बन स्मार्ट स्ट्रीटविरोधात माया बारणे यांचे हस्ताक्षर आंदोलन

अर्बन स्मार्ट स्ट्रीटच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिका कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे - शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरा समोरील रस्त्यावर अर्बन स्मार्ट स्ट्रीटच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad) कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेविका माया बारणे यांनी हस्ताक्षर आंदोलन सुरू केल आहे.

आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा 34 मीटरचा रस्ता अर्बन स्मार्ट स्ट्रीटच्या नावाखाली विकसित केल्याने हा रस्ता अजूनच अरुंद होईल आणि या रस्त्यावर पाथरी व्यवसायासाठी बसणारे कित्येक जण बेरोजगार होतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका माया संतोष बारणे यांनी केला आहे. (Tajya News)

मागच्या वर्षी ज्या रस्त्यावर 65 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला, आता त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा अर्बन स्मार्ट सिटीच्या नावाखाली 25 कोटी रुपयाची उधळपट्टी केली जाणार आहे. त्यामुळे आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा 34 मीटरचा रस्ता अजूनच अरुंद होईल असा आरोप माया संतोष बारणे यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा रस्ता अर्बन स्मार्ट स्ट्रीटच्या नावाखाली विकसित केला जाणार आहे. थेरगाव परिसरात अनेक असे रस्ते आहेत ज्यांना विकसित करण्यासाठी निधीची गरज आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप माया बारणे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेली उधळपट्टी त्वरित थांबवावी अशी मागणी हस्ताक्षर मोहीम आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर हिना खान भडकली, फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली?

Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

Pollution Free Pune : पुणेकरांनो मोकळा श्वास घ्या, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली, देशात दहावा क्रमांक

SCROLL FOR NEXT