Navle Bridge Accident
Navle Bridge Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटला, वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

Dnyaneshwar Choutmal

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Navle Bridge Accident: पुणे शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ (Pune News) सोमवारी सकाळच्या सुमारास कोळशाने भरलेला कंटेनर भीषण अपघात (Accident) झाला आहे. तीव्र उतारावर असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट डिव्हायडरला धडकून रस्त्यावर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातात कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या जवळपास ४ किलोमीटपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या कंटेनरला बाजूला करण्याचं काम सुरू केलं आहे. कंटेनरमध्ये ४० टन कोळसा असल्याने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने कोळसा वाहून नेत होता. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कंटेनर नवले पुलावर (Navle Bridge) आला असता, तीव्र उतारावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट डिव्हायरला धडकला. कंटेरनचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळित करणाचे प्रयत्न सुरू आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT