Twin Towers Pune Chandni Chowk Saam TV
मुंबई/पुणे

Chandni Chowk: ट्विन टॉवरप्रमाने चांदणी चौकातील पूल देखील काही क्षणात होणार जमीनदोस्त

नोएडातील ट्वीन टॉवर पाडलेली संस्था चांदणी चौकातील पूल पाडणार असून यासाठी पूल परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून एक पथक पुण्यात.

Jagdish Patil

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: मागील अनेक दिवसांपासून नोएडामधील 'ट्विन टॉवर'ची (Twin Towers) चर्चा सुरू होती. हा टॉवर अवघ्या काही क्षणात होत्याचा नव्हता झाला. ब्लास्टमुळे तो सेकंदात जमीनदोस्त झाला आणि ३०० कोटी रुपयांच्या त्या भल्यामोठ्या वास्तूचा धुरळा झाला. या टॉवर पडलेले क्षण खूप व्हायरल झाले होते. मात्र, आता अशा कंट्रोल ब्लास्टिंगचा अनुभव पुणेकरांना येण्याची शक्यता आहे.

कारण बहुचर्चित आणि सततच्या वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असणारा पुण्यातील चांदणी चौकातील (Chandni Chowk) पूल देखील आता दहा सेकंदात पाडणार असल्याची माहिती समोर येत आहे. नोएडातील ट्वीन टॉवर पाडलेली संस्था चांदणी चौकातील पूल पाडणार असून यासाठी पूल आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून एक पथक पुण्यात (Pune) दाखल होणार असल्याचंही समजतं आहे.

पाहा व्हिडीओ -

तसंच हा पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीचा वापर होणार आहे. त्यामुळे ट्विन टॉवर प्रमाणे हा पूल देखील १० सेकंदात जमिनदोस्त होणार आहे. मागील काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता.

यावेळी या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एक निवदेन देण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून चांदणी चौक परिसराची पाहणी करण्यात आली हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता चांदणी चोकातील पूल देखील ब्लास्ट करुन पाडण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Potato Benefits: उकडलेले रताळे खल्ल्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, २८ दिवसांची वैधता

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? पक्षाचे वरिष्ठ नेते एकाच नावावर ठाम

Maharashtra Politics: तेराव्या दिवसानंतर गौप्यस्फोट करणार; पवार कुटुंबियातील बड्या नेत्याचा सूचक इशारा

Maharashtra Live News Update: पेट्रोल भरण्याच्या कारणावरून कामगाराला मारहाण, सीसीटीव्ही मध्ये कैद

SCROLL FOR NEXT