Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! फॉरमायका कपंनीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर झाडांची कत्तल

पिंपरीतील अपना - वतन या सामाजिक संघटनेण हे प्रकरण उघडकीस आणलं आहे आणि त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे - उद्योगनगरीं पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहारातील फॉरमायका कपंनीत मोठ प्रमाणात बेकायदेशीर झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तोडलेल्या वृक्षाचे पुरावे नष्ट करण्यासाठी, या जागेचं JCB द्वारे सपाटीककरणं करण्यात आलं आहे. मात्र आता परिसरात दिसणाऱ्या या मोकळ्या भूखंडावर किती मोठ्या प्रमाणात वृक्ष होते. हे या सॅटॅलाइट इमेज वरून स्पष्ट होत आहे.

पिंपरीतील अपना - वतन या सामाजिक संघटनेण हे प्रकरण उघडकीस आणलं आहे आणि त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांनी आता संबंधित कंपनी प्रशासनाला अवैध वृक्ष तोड केल्या प्रकरणी तब्बल 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे देखील पाहा -

मात्र महापालिका करत असलेली कारवाई किरकोळ असून प्रशासक राजेश पाटील हे वृक्ष तोड प्रकरणात सहभागी असलेल्या ठेकदार आणि पालिका अधिकारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप आता अपना वतन संघटनेनं केला आहे. त्यामुळे शेकडो देशी झाडांची कत्तल करणाऱ्या या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारा पिंपरीतील खरा पुष्पा कोण? असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

विकासाच्या नावावर पिंपरी -चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु आहे. राजकीय पुढारी , वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने अतिशय पद्धतशीरपणे उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत असल्याचा आरोप देखील संतप्त नागरिकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल! टेस्ट पास करण्यासाठी सरकारचा नवा नियम आला समोर, वाचा सविस्तर

भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Business Ideas For Women: 12 वी पास महिलांसाठी कामाची संधी, हे 5 बिझनेस लवकरात लवकर सुरू करा

ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत तणाव? भाजपचा जरांगेंआडून शिंदेंना संपवण्याचं कट? फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कुणाची ताकद?

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पैशांचा सुळसुळाट, मतदारांना 10 हजार वाटल्याचा विरोधकांचा आरोप

SCROLL FOR NEXT