Pune News saam tv
मुंबई/पुणे

Pune News: मटण खाताय तर सावधान! मटण खाल तर जीवानिशी जाल

70-year-old Man Dies While Eating Mutton: मटण खाताय तर सावध व्हा, कारण एका व्यक्तीच्या जीवावर मटण खाणं बेतलं असतं.काय आहे हा प्रकार पाहुयात

Bharat Mohalkar

उन्हाळा सुरु झाला की लग्न, जागरण गोंधळ, कंदुरी आणि जत्रात मटणाचे फक्कड बेत आखले जातात. तुम्ही असा बेत आखत असाल तर सावधान. कारण मटणाचा बेत जीवावर बेतू शकतो. त्याचं झालं असं की, इंदापुरात 70 वर्षांच्या आजोबाला मटण खाणं चांगलंच महागात पडलंय.. मटणातलं हाड चावून खाताना ते थेट आजोबाच्या घशात गेलं आणि त्या हाडकामुळं अन्ननलिकेला छिद्र पडलं. शेवटी डॉक्टरांनी ऑपरेशन करुन आजोबांचा जीव वाचवला. मात्र हे नेमकं कसं घडलं? पाहूयात.

24 फेब्रुवारीला आजोबा लग्नाला गेले

लग्नात जेवताना मटणाचं हाड घशात अडकलं

घरच्यांनी इंदापूरात दवाखान्यात नेलं

आजोबांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं

डॉक्टरांनी सीटी स्कॅन केला आणि 5 सेंटीमीटरचं हाड आढळलं

इंडोस्कोपी करुन ते हाड बाहेर काढलं

त्यानंतर स्टेंट टाकून अन्ननलिकेचं छिद्र बुजवलं

मात्र हे ऑपरेशन प्रचंड गुंतागुंतीचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या, जत्रा आणि कार्यक्रमही सुरु होत आहेत. त्यामुळे तुम्ही मटणाचा बेत करत असाल तर डोळे उघडे ठेवा..कारण मटणाची मज्जा जीवापेक्षा मोठी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT