Party cab Saam tv
मुंबई/पुणे

31st night party : थर्टी फर्स्टला टल्ली झालात तर...; हॉटेल मालकांनी घेतला महत्वाचा निर्णय

Pune Restaurants Plan: मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या ग्राहकांना कॅब करुन घरी सोडण्याचा निर्णय पुण्यातील काही हॉटेल्सनी घेतला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करणे हा यामागील उद्देश आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune 31 st Night Party Celebration : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुण्यातील पब, कॅफे, हॉटेल्सकडून जोरात तयारी सुरू आहे. या प्रसंगी काही हॉटेल,रेस्टॉरंट मालकांनी 'ड्रिंक केलेल्या ग्राहकांना घरी सोडण्याची सोय' करण्याचा निर्णय घेतला आहे.

नववर्षानिमित्त पुण्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्या ३१ डिसेंबर रोजी सुरु झालेली पार्टी १ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. तेव्हा पुणेकरांच्या सोयीसाठी काही हॉटेल्सनी मद्यपान केलेल्या ग्राहकांना घरी सोडण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ३१ डिसेंबरला मध्यरात्री अनेकजण पार्टीत मद्यपान करतात आणि वाहने चालवतात. मद्यपान केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. ही गोष्ट लक्षात घेऊन हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने काही नियम बनवण्यात आले आहेत.

पुणे हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संबंधित प्रकाराची माहिती दिली. 'काही वर्षांप्रमाणे यावर्षीही पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी दिल्याबद्दल शासनाचे आभार. पार्टीला येणारा प्रत्येक ग्राहक हा आपला जबाबदारी आहे. एखादा ग्राहक अतिप्रमाणात मद्यपान करत असेल, तर त्याच्यासोबत असलेल्यांना सांगून ड्रिंक सर्व्ह करणे बंद करावे असे आवाहन आम्ही सर्व हॉटेल्सना केले आहे.' असे त्यांनी म्हटले.

"जर ग्राहकाला जास्त झाली असेल तर त्याला ड्रिंक सर्व्ह करु नये. जास्त मद्यपान केलेला ग्राहक जर स्वत: गाडी चालवणार असेल, तर त्याला कॅब करुन घरी सोडले जाईल. त्याने गाडीची चावी हॉटेलमध्ये ठेवली तर ती चावी दुसऱ्या दिवशी ग्राहकापर्यंत पोहोचवू", असेही गणेश शेट्टी यांनी म्हटले आहे. नववर्षाला गालबोट लागू नये या उद्देशाने पुण्यातील हॉटेल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT