Maharashtra Politics Breaking News:  Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजप पदाधिकारी थेट बोलला; VIDEO

Maharashtra Politics Breaking News: पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून शिरुर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाअध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भूमिका मांडली.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २७ जून २०२४

'अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला, महायुतीमध्ये अजित पवार नको आणि अजित पवार असतील तर विधानसभेला सत्ताही नको', असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आमदार राहुल कुल यांच्यासमोरच खदखद मांडली. पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून शिरुर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार राहुल कुल यांच्यासह जिल्ह्यातील नेते तसेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाअध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भूमिका मांडली.

काय म्हणाले सुदर्शन चौधरी?

"खरचं कार्यकर्ते काय सांगतत याचा विचार करणार असाल तर अजित दादांना महायुतीमधून बाहेर काढा. त्यांनी सुभाषबापू, योगेश अण्णा, राहुल दादांवर अन्याय केला. हे तिघेच्या तिघे नेते मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते, असे सुदर्शन चौधरी म्हणाले. तसेच ज्यांना आम्ही १० वर्ष विरोध केला, तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी बसवली. अशी सत्ता आम्हाला नको," अशी खदखदही चौधरी यांनी मांडली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांनंतर राज्यातील महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. विशेषतः अजित पवार यांच्यावर महायुतीमधील पक्ष नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी रामदास कदम यांनी केलेले विधान, त्यानंतर आरएसएच्या मुखपत्रातूनही याबाबत थेट भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्याने जाहीरपणे भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT