pune news Friend killed for having affair with girlfriend youth sentenced to life imprisonment Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: माझ्या गर्लफ्रेंडसोबत फिरतोच कसा, तरुणाला राग अनावर; थेट मित्राचं शीर धडावेगळं केलं, आरोपीला जन्मठेप

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Crime News

प्रेयसीसोबत फिरतो म्हणून तरुणाला राग अनावर झाला. त्याने चाकूने सपासप वार करुन मित्राची हत्या केली. इतकंच नाही, तर त्याचे शीर धडावेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने आरोपी तरुणाला १ लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Latest Marathi News)

निजाम आसगर हाशमी (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा येथे १९ जून २०१८ रोजी उमेश भीमराव इंगळे या तरुणाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता.

या तरुणाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना (Police) होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत निजाम हाशमी याला अटक केली. सुरुवातीला हाशमी याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हाशमी याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच तरुणीसोबत उमेश देखील फिरत होता. त्यामुळे उमेश आणि हाशमी यांच्यात वाद झाला. माझ्या प्रेयसीसोबत का फिरतो? तिच्यासोबत लगट का करतो? असं म्हणत हाशमीने उमेशसोबत वाद घातला.

दरम्यान, खून झाला त्या दिवशी हाशमी हा शिरखुर्मा पिण्याच्या बहाण्याने इंगळे याला बाहेर घेऊन गेला. त्यानंतर चाकूने वार करत त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने उमेशचे गुप्तांग कापून पिशवीत टाकले. ती पिशवी स्वारगेट येथील कॅनॉलमध्ये फेकून दिली होती.

या पिशवीत सत्तूर आणि इंगळेचा मोबाईल, आधार आणि पॅन कार्डही होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हाशमीला अटक केली. घटनास्थळावरुन महत्वाचे पुरावे देखील जप्त करण्यात आले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी २४ साक्षीदार तपासले. यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT