Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Pune News : पुण्यातील सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात नवा राजकीय वळण. जामिनावर सुटलेल्या फारुख इनामदार यांनी काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर टिपू पठाण टोळीशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

Akshay Badve

  • सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

  • जामिनावर सुटताच फारुख इनामदार यांचा काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर आरोप

  • टिपू पठाण टोळीशी जगताप यांचे संबंध असल्याचा दावा

  • पुण्यातील राजकीय वातावरण तापले, प्रकरणाला नवा वळण

काँग्रेस चे प्रशांत जगताप यांच्यावर त्यांच्या आधीच्या पक्षातील पदाधिकारी फारूक इनामदार यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत जगताप यांचे गुंड टिपू पठाण याच्यासोबत घनिष्ट संबंध असल्याचा आरोप इनामदार ने केला आहे. एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याप्रकरणी फारुख इनामदार याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला असून त्याने आता थेट प्रशांत जगताप यांच्यावर आरोप केले आहेत.

पुण्यातील प्रभाग ४१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार फारुख इनामदार यांच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फारुख इनामदार यांनी पुण्यातील कॅम्प परिसरातील राहणाऱ्या सादिक कपूर याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणी आणि जागेच्या व्यवहारातून सादिक यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान, सादिक ने त्याच्या कार्यालयात आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाईड नोट मध्ये तसेच हातावर फारुख इनामदार चे नाव लिहिले होते. पुणे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, इनामदार सह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सादिक कपूर हा मोक्यातील आरोपी होता त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सादिक कपूर याने आत्महत्या करण्यापूर्वी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांना कुरिअरद्वारे एक पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये फारुक इनामदार हा टिपू पठाण टोळीचा आका आहे; तसेच राजकीय लोकांच्या नावाखाली आमच्या भागात गोरगरिबांच्या जमिनी लाटण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्याने या पत्रात केला होता.

इनामदार याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर त्याने आता थेट प्रशांत जगताप यांच्यावर आरोप केले आहेत. "सादिक कपूर आत्महत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही. मी कधी ही त्याचशी फोन वर बोललो नाही. माझ्यावर जे आरोप झाले ते चुकीचे असून प्रशांत जगताप यांचे गुंड टिपू पठाण याच्याशी घनिष्ट संबंध आहेत. टिपू पठाण ने प्रशांत जगताप यांचा विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार केला होता. माझ्यावर आरोप करण्याचं कारण म्हणजे विधानसभेला मी प्रशांत जगताप यांचं काम केलं नव्हतं आणि याचा राग मनात ठेऊन त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत," अशी प्रतिक्रिया जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार फारुख इनामदार कडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy CM Maharashtra: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार सक्रिय;'या' जिल्ह्याचा करणार दौरा

Diamond Mangalsutra: डायमंड मंगळसूत्र घेताय? मग या 6 लेटेस्ट डिझाईन एकदा पाहाच

विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे? ऐनवेळी पायलट का बदलला? अजित दादांचा घातपात? दोन बड्या नेत्यांना दाट शंका|VIDEO

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

अर्थसंकल्पात दारू महागली, तरुणाई दु:खात बुडाली; भाववाढीवर कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT