Pune Fake Bail Racket case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात बनावट जामीनदाराच्या रॅकेटचा पदार्फाश; वकिलांसह ११ जणांना अटक

Pune Fake Bail Racket : पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बनावट जामीनदाराच्या रॅकेटवर कारवाई केली आहे. या टोळीकडून रेशनकार्ड, आधारकार्ड यांसारखे बोगस कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुणे पोलिसांनी बनावट जामीनदारांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ११ आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांच्या मदतीने बनावट जामीनदार तयार केले जात होते. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचण्यात आला होता.

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयातील गंभीर गुन्ह्यामध्ये अटक असणाऱ्या आणि कारागृहामध्ये असणाऱ्या आरोपींना बोगस जामीनदार हजर करुन त्यांची खोटी कागदपत्रे बनवून, काही वकिलांच्या मार्फत जामीन मिळवून देण्याचे रॅकेट वानवडी पोलिसांनी उघडकीस आणले आहे. यामध्ये आतापर्यंत ११ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे ग्रामीण परिसरातून बोगस जामीनदार तयार करण्यात आले होते.'

'त्याचबरोबर बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड, सातबारा उतारे, पुरवठा अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करणारी टोळी यांनाही अटक करण्यात आली आहे. बोगस जामीनदारांना न्यायालयासमोर हजर करणाऱ्या दोन वकिलांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या बनावट जामीनदारांना जाण्या-येण्याचा प्रवास खर्च, जेवण यासह दीड-दोन हजार रुपये मिळायचे. खोटी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला प्रत्येक जामीनामागे तीन ते चार हजार रुपये मिळायचे. उर्वरित रक्कम वकिलांना मिळायची', अशी माहिती शिंदे यांनी माध्यमांना दिली.

४ जानेवारी २०२५ रोजी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचण्यात आला होता. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. आरोपींकडून ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित आधारकार्ड यांच्यासह इतर बनावट कागदपत्रे, मोबाईल हँडसेट आणि डिओ मोपेड असा एकूण ८९,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT