Pune Kothrud Pickup Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकाने ४ ते ५ वाहनांना उडवलं; धडकी भरवणारा VIDEO

Pune Kothrud Pickup Accident : ऐन गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात एका पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत ४ ते ५ वाहनांना धडक दिली.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. गणेशोत्सवाच्या काळात एका पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत ४ ते ५ वाहनांना धडक दिली. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

पुण्याच्या कोथरुड (Pune News) भागात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. कोथरूड परिसरात असलेल्या करिश्मा चौकातील सिग्नलवर त्याने आधी दोन लहान मुलांना उडवले. इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने सुसाट पिकअप चालवत पौड फाटा येथील सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडला.

त्यानंतर दोन दुचाक्यांना जोरदार धडक दिली. यानंतर त्याने एका कारला पिकअप धडकवला. अशा प्रकारे पिकअप चालक करिश्मा चौकापासून सात ते आठ जणांना उडवत आला. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत सहा ते सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पिकअप चालकाला पकडलं आणि बेदम चोप दिला. पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आरोपी पिकअप चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT