Dagdusheth Ganpati News
Dagdusheth Ganpati News Saam Tv
मुंबई/पुणे

Dagdusheth Ganpati : 'दगडूशेठ' गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; मंदिर परिसरात भक्तांची मांदियाळी

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. (Latest Marathi News)

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

मंदिरातील गाभारा व सभामंडप सजावटीबाबत ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, द्राक्षाच्या हंगामात सलग दुस-या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती'.

'हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती (Farming) सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतकऱ्यांच्या वतीने साकडे घालण्यात आले, असेही चव्हाण म्हणाले.

दरम्यान, गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरासाच्या सजावटीवर भाविक दिव्याने प्रतिक्रिया दिली. 'माझं नाव दिव्या असून सोलापूरची आहे. मी नोकरीमुळे पुण्यात राहते. येथे फारच सुंदर द्राक्षाची आरास केली आहे. आज गर्दी फार असून आज फारच उत्साहाचं वातावरण दिसत आहे'.

तर राजेश आगरवाल यांनी सांगितले की, 'मी वर्षांपूर्वी गणपतीला मानत नव्हतो. मी एक-दोन वेळा धंद्याच्या निमित्त पुण्यात (Pune) आलो. त्यानंतर गणपतीचे दर्शन करायला लागलो. मी आता दरवर्षी दोन गणपतींचे दर्शन करतो. आम्ही दर चतुर्थीला येतो. आजची द्राक्षाची आरास खूप सुंदर झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या झळा! पाण्याला मिळतोय सोन्याचा भाव; टँकर वाल्यांची चांदी

Baramati Lok Sabha Votting Live: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

SCROLL FOR NEXT