Women Beating Husband In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: मोड आलेले हरभरे खाल्ले, नवऱ्याला बेदम चोपले; बायकोविरोधात गुन्हा

Women Beating Husband In Pune: घरातील मोड आलेले हरभरे खाल्ल्याच्या कारणावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. या वादादरम्यान महिलेने नवऱ्याला बेदम मराहाण केली.

Priya More

सचिन जाधव, पुणे

क्षुल्लक कारणांवरून नवरा-बायकोची भाडणं ही होतच असतात. या भांडणामध्ये नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहल्या असतील. पण बायकोने नवऱ्याला मारहाण केल्याचे तुम्ही ऐकले नसेल. तर पुण्यामध्ये बायकोने नवऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोड आलेले हरभरे खाल्ल्याने बायकोने नवऱ्याला लाटण्याने मारहाण केली. याप्रकरणी बायकोविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सोमवार पेठेमध्ये ही घटना घडली आहे. घरातील मोड आलेले हरभरे खाल्ल्याच्या कारणावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की बायकोने नवऱ्याच्या डोक्यात मिक्सरचे भांड घालून त्याला जखमी केले. ऐवढ्यावर न थांबता या महिलेने नवऱ्याला लाटण्याने देखील मारहाण केली.

रविवारी १ डिसेंबर रोजी ही घटना घडली. सोमवार पेठेमध्ये राहणाऱ्या महिलेने घरामध्ये हरभरे भिजत ठेवले होते. या महिलेच्या नवऱ्याने मोड आलेले हरभरे खाल्ले. याचा राग आल्याने ही महिला आणि तिच्या नवऱ्यामध्ये जोरदार भांडण झाले. महिलेने नवऱ्याला शिवीगाळ करून लाटण्याने त्याला मारहाण केली. त्यानंतर या महिलेने नवऱ्याच्या डोक्यात मिक्सरचे भांडे मारले. याचसोबत नवऱ्याच्या उजव्या हाताच्या करंगळीचा जोरात चावा घेऊन नख तोडले.

बायकोच्या मारहाणीमध्ये पतीला चांगलीच दुखापत झाली आहे. याप्रकरणी महिलेविरोधात तिच्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ४४ वर्षीय नवऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर ४० वर्षीय बायकोविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना पुण्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT