PM Narendra Modi  Saam TV
मुंबई/पुणे

Bomb Blast Threat: देशभरात बॉंम्बस्फोट घडवण्याचा इशारा, PM मोदींना जीवे मारण्याची धमकी... पुण्यात खळबळ

Pune Threat Call: व्यक्तीच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune News: पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मेलवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतात विविध ठिकाणी बॉंम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याची धमकी या कमेंटमधून देण्यात आली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारासाठी आलेला व्यक्ती एक वेबसाईट चालवतो. या वेबसाईटवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच गोंधळ उडाला.

"मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे," असा मजकूर या मेल मध्ये होता. तसेच देशात अनेक ठिकाणी बॉंम्बस्फोट घडवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बॉंम्बने उडवण्याची धमकी या कमेंटमधून देण्यात आली.

या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता त्यांनी तात्काळ पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. या व्यक्तीच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT