BJP
BJP Saam TV
मुंबई/पुणे

Pune Byelection: चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप बाजी मारणार, भाजप किती मताधिक्याने जिंकणार? वाचा 'रिंगसाईड रिसर्च'चा अंदाज

Dnyaneshwar Choutmal

पुणे : चिंचवड पोटनिवडणूक तिरंगी बनली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत 'रिंगसाईड रिसर्च'चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक अनेक कारणांनी गाजली. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. (Pune News)

तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाविषयी रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे..

रिंगसाईड रिसर्च या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणातून चिंचवड विधानसभेची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मतदारसंघात एकूण 5,68,954 मतदान आहे. तर पोटनिवडणुकीत 2,87,145 (50.47 टक्के) एवढं मतदान झाला आहे.  (Latest Marathi News)

रिंगसाईड रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार उमेदवाररनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची विभागणी

>> अश्विनी लक्ष्मण जगताप (BJP) : 45% ते 47%

>> नाना काटे (NCP) : 31% - 33%

>> राहुल कलाटे (अपक्ष) : 18% - 20%

>> इतर : 2% - 4%

>> भाजपचे विजयी मताधिक्य : 12% - 16%

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : राज्यात पाचव्या टप्प्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

SCROLL FOR NEXT