Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune : आवाजाची मर्यादा ओलांडली नाही; भाजप खासदारांनी बंद पाडलेल्या गरबा कार्यक्रमाच्या आयोजकांचे स्पष्टीकरण

Pune News : पुण्यातील कोथरूड परिसरातील जीत ग्राउंडवर आयोजित केलेल्या गरब्याचा कार्यक्रम आवाजाची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला होता यावर आयोजकांनी स्पष्टीकरण दिले

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : नवरात्री निमित्ताने पुण्यातील अनेक ग्राउंड आणि लॉन्सवर गरब्याचे कार्यक्रम होत आहेत. दरम्यान एका कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यसभेच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद पाडला. मात्र या गरबा कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडली नसल्याचे स्पष्टीकरण आयोजनकांद्वारे करण्यात आले आहे. 

पुण्यातील कोथरूड परिसरातील जीत ग्राउंडवर आयोजित केलेल्या गरब्याचा कार्यक्रम आवाजाची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला. तसेच परिसरात राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आणि काही रुग्णांना या आवाजाचा त्रास होत आल्याच्या तक्रारींचा मेसेज सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी वाचून दाखवला होता. ज्याठिकाणी कार्यक्रम झाला ते महापालिकेचे ग्राउंड नसताना सुद्धा इथे परवानगी कशी दिली? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.

मेधा कुलकर्णी या म्हणाल्या होत्या, कि सणांचे आक्षेपार्ह आणि विडंबन होऊ नये म्हणून जन आंदोलन उभे करणार आहोत. पोलिस ठाणे तिथून ५ मिनिट अंतरावर आहे. २ कॉन्स्टेबल असताना ते बघत होते. मी तिथलं साहित्य उचलले आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी हात लावला नाही. आपण लोकांचे जीव घेणार आहोत का? लोकं सणांना बाहेर निघून जात आहेत. लोकांना परावृत करता आहेत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला 

खासदारांचा दावा काढला खोडून  
दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमाचे आयोजकांमधील अमर गायकवाड यांनी मात्र मेधा कुलकर्णी यांचा दावा खोडून काढला आहे. याबाबत गायकवाड यांनी सांगितले, कि शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने जीत ग्राऊंड येथे आयोजित नवरात्र दांडिया महोत्सवात खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमात येऊन आयोजकांशी न बोलता काहीही सूचना न देता निव्वळ प्रसिद्धीच्या स्टंटबाजीसाठी येऊन साऊंड वरती चढून बोलत होत्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण

Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉमन मॅन, त्यांना कोणीही डिस्टर्ब करू शकत नाहीत - मंत्री प्रकाश आबिटकर

कलयुग! बीडमध्ये नात्याला काळिमा; मुलगा सावत्र आईला घेऊन पळाला

Bra design: ब्रामध्ये एकसारखे 3 हुक का असतात? 99 टक्के मुलींनाही माहिती नसेल कारण

SCROLL FOR NEXT