IAS Pooja Khedkar Saam Digital
मुंबई/पुणे

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या कुटुंबीयांना दिलासा, कर भरल्याने 'त्या' कंपनीचा लिलाव टळला

Pimpari-Chinchwad Municipal Corporation: पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर असलेली कंपनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून जप्त होणार होती. या कंपनीने पालिकेचा कर बुडवला होता त्यामुळे ही कारवाई होणार होती.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात (Pooja Khedkar Case) मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी कंपनीचा थकित कर अखेर ऊभरला. त्यामुळे खेडकर यांच्या नावावर पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथे असणाऱ्या कंपनीचा लिलाव टळला आहे. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर असलेली कंपनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून जप्त होणार होती. या कंपनीने पालिकेचा कर बुडवला होता त्यामुळे ही कारवाई होणार होती. पण आता खेडकर कुटुंबीयांनी थकित कर भरल्यामुळे पालिकेकडून कारवाई होणार नाही.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीने पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचा तब्बल २ लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर भरला नव्हता. तसंच, १ लाख ७८ हजार रुपयांची पाणीपट्टी भरली नव्हती. पण आता खेडकर कुटुंबीयांनी हा थकीत कर आणि पाणीपट्टीचे पैसे भरले आहेत. कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली. खेडकर कुटुंबीयांनी हा कर भरल्याने कोट्यवधी रुपये किंमतीच्या या कंपनीचा पुढील आठवड्यात होणारा लिलाव अखेर टळला आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबानगर तळवडे येथे मनोरमा खेडकर यांची थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे २ लाख ७७ हजार इतके कर मागील दोन वर्षांपासून बुडवले होते. महत्वाचे म्हणजे खेडकर कुटुंबीयांनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रेड झोनमध्ये उभारली आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांची ही कंपनी अनधिकृत असल्याचा शिक्कामोर्तब पिंपरी चिंचवड महापालिकेने केला होता.

दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सोमवारी दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. 'पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करणे आवश्यक नाही.', असे हायकोर्टाने सुनावणी दरम्यान सांगितले होते त्यामुळे पूजा खेडकर यांची अटक दटळली होती. 'हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये.', असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने तपास यंत्रणेला दिले होते. २१ ऑगस्टला या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT