Bhushi Dam Overflow Saam Tv
मुंबई/पुणे

Bhushi Dam: आनंदाची बातमी! मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो, पर्यटकांची मोठी गर्दी

Bhushi Dam Overflow: पुणे आणि मुंबईवरून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना आता भुशी डॅमवर जाऊन आनंद घेता येणार आहे. कारण भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. डॅमवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

पावसाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये (Lonavala) फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे आणि मुंबईवरून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना आता भुशी डॅमवर (Bhushi Dam) जाऊन आनंद घेता येणार आहे. कारण भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुशी डॅम आज ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रचंड आनंद झाला आहे.

लोणावळा भागातील स्थानिक व्यवसायिक आणि पर्यटक मागील महिनाभरापासून भुशी डॅम ओव्हर फ्लो होण्याची आतुरतेने वाट पहात होते. अखेर आज तो क्षण आला. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि रविवारी सकाळपासून झालेला पावसामुळे भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. भुशी डॅमच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे आज लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना प्रचंड आनंद झाला आहे. मोठ्यासंख्येने पर्यटकांनी भुशी डॅमवर गर्दी केली आहे.

पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातील भुशी धरणावरील वर्षाविहार हा पर्यटकांचा आनंदाचा आणि आकर्षणाचा विषय असतो. मागील काही दिवसांपासून स्थानिक नागरीक आणि पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पहात होते. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने स्थानिक विक्रेत्यांनी जल्लोष केला. तसेच पर्यटकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. भुशी डॅमवर येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना या काळात पैसे कमावण्याची संधी असते. त्यामुळे आता भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्यामुळे स्थानिकांना देखील आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT