Bhushi Dam Overflows: पर्यटकांची मज्जाच मज्जा! भुशी डॅम ओव्हरफ्लो; लोणावळ्यात मुसळधार पाऊस

Bhushi Dam News: आता निसर्ग इतका बहरलाय म्हटल्यावर पर्यटक मागे कसे राहतील.
Bhushi Dam Overflows
Bhushi Dam OverflowsSaam TV
Published On

दिलीप कांबळे

Bhushi Dam Overflows News: पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, आणि थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरुये. या पावसाने इथला निसर्ग संपूर्ण नटून गेलाय. सह्याद्रीच्या पर्वत रांगा धुक्यात हरवल्या आहेत. त्यातूनच छोटे छोटे धबधबे वाहू लागलेत. आता निसर्ग इतका बहरलाय म्हटल्यावर पर्यटक मागे कसे राहतील. विकएंड साजरा करण्यासाठी पर्यटक इथं गर्दी करतायेत. (Latest Marathi News)

दरम्यान लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण पाच दिवसातच ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील अनेक पर्यटकांनी या ठिकाणी धाव घेतली आहे.

भुशी धरण नेहमीच पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा प्रश्न राहिला आहे. तरुणांपासून ते लहाण मुलं आणि अगदी वृद्ध व्यक्ती देखील धो-धो पावसासह धरणातील पाण्यात भीजण्याचा आनंद लूटत असतात.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, कोलटेने परिसरात काल पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पुन्हा एकदा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. डोंगर रांगांवरून पांढरेशुभ्र धबधबे कोसळू लागल्याने या परिसरात जलोत्सव सुरू झाला आहे. भात खाचरे भरल्याने शेतकरी समाधानी असून आदिवासी बांधव भात लागवडीसाठी सज्ज झाले आहेत.

सूर्या नदी ओसंडून वाहू लागली

सलग सहाव्या दिवशी पालघरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहताना बघायला मिळत आहेत. सूर्यप्रकल्पाच्या धामणी धरणामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडल्याने धामणी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख सूर्या आणि वैतरणा या नद्यांना चांगला पूर आला असून सूर्या नदी ओसंडून वाहत आहेत.

तर वसई विरार महानगर पालिका आणि तारापूर औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या शहरांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

धबधब्याचं रौद्र रूप

गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुरगाण्यातील प्रसिद्ध भिवतास धबधबा ओसंडून वाहू लागलाय. संततधार पावसानं शिव नदीला आलेल्या पुरामुळे दीडशे ते दोनशे फूट उंचावरून कोसळणाऱ्या भिवतास धबधब्याचं रौद्र रूप सध्या पाहायला मिळतंय.

नाशिकपासून तब्बल ८० किलोमीटर अंतरावर असलेला हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. भिवतास धबधबा सध्या खळाळून वाहत असला तरी उंच कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्यासोबत दगड, माती देखील वाहून येण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी धबधब्याखाली न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com