ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्याच्या दिवसातही हे ठिकाण पर्यटकांनी भरुन जाते.
पावसात तुम्हीही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर लोणावळ्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.
पावसाळ्यात अनेक पर्यटक लोणावळ्यातील भुशी तलाव पाहण्यासाठी खास जातात. तर तुम्ही या ठिकाणी नक्की जाऊन या.
लोणावळा आणि खंडाळ्याच्या दऱ्यांमध्ये कुणे धबधबा तुम्हाला दिसून येईल. पावसाळ्या दिवसात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते.
सर्वात जुन्या लेण्यांपैकी ही कारला लेणी आहे. पावसाळ्यात लेणीचा परिसर हिरवाईने सजून जातो.
ट्रेकर्ससाठी राजमाची किल्ला अतिशय लोकप्रिय आहे. पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण किल्लाच्या परिसर अतिशय मनमोहक दिसू लागतो.
लोणावळ्यात जर तुम्ही गेलात तर आवर्जून टायगर्स पॉइंटवर जा.
लोणावळ्यापासून काही अंतरावर लोहगड किल्ला आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी जात असतात.