Shreya Maskar
मुंबईत पावसाचे सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही.
पावसात एक दिवसाची ट्रिप प्लान करताय? तर मुंबईतील 'या' निसर्गसौंदर्याला आवर्जून भेट द्या.
मुंबई येथील चिंचोटी धबधबा निसर्गाचे अद्भुत रूप आहे.
हा निसर्गरम्य धबधबा तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात आहे.
चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जंगलातून तुम्हाला ट्रेक करावा लागेल.
या ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला भरपूर पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील.
चिंचोटी धबधबा पालघर जिल्ह्यात येतो.
वसई रेल्वे स्टेशनला उतरून रिक्षाने चिंचोली गावात पोहचावे आणि त्यानंतर चिंचोटी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जंगलातून छान ट्रेक करावा लागेल.
चिंचोटी धबधब्याजवळ अशोक धबधबा, वसई बीच ही निसर्गरम्य ठिकाणे देखील आहे.
चिंचोटी धबधबा फोटोशूटचे उत्तम ठिकाण आहे. तसेच येथे निसर्गाची विविध रूप पाहायला मिळतील.