Shreya Maskar
मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. पण आजकाल मुंबईतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर आपल्याला गर्दी पाहायला मिळते.
तुम्ही जर मुंबईत शांत समुद्रकिनारा शोधत असाल तर, नालासोपारा येथील कळंब बीचला आवर्जून भेट द्या.
कळंब बीचला आल्यावर तुम्हाला मनाला शांती, एकांतासोबतच स्वतःसाठी उत्तम वेळ मिळेल.
हा अथांग समुद्र स्वच्छ आणि चहूबाजूंनी हिरवागार आहे.
नालासोपारा येथील कळंब गावात हा कळंब बीच आहे.
वसई तालुक्यातील या निसर्गरम्य कळंब बीचला तुम्ही पावसात आवर्जून भेट द्या. पावसात याचे सौंदर्य मनाला मंत्रमुग्ध करणारे असते.
कळंब बीच वरून तुम्हाला सूर्यास्ताचे निसर्गरम्य दृश्य पाहता येईल.
कळंब समुद्रकिनाऱ्यापासून डहाणू, पालघरच्या समुद्र किनाऱ्यांचे देखील सुंदर दर्शन होते.
कळंब समुद्रकिनाऱ्याची वाळू चंदेरी रंगाची आहे.
पश्चिम रेल्वेच्या नालासापोरा स्टेशच्या पश्चिम बाजूला उतरून तुम्ही रिक्षाने या समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकता.