Air quality in Pune poor due to bursting of firecracker air pollution diwali festival 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Pune Air Pollution: पुणेकरांनो, काळजी घ्या! शहरातील हवेची गुणवत्ता खालावली; तुमच्या शहराची स्थिती काय?

Pune Air Quality Index Update: फटाक्यांच्या आतषबाजीचा फटका पुणेकरांना बसला असून शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Air Pollution:

राज्यभरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे. प्रत्येक शहरात फटाक्यांची आतषबाजी अन् धुमधडाका पाहायला मिळत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीचा मोठा परिणाम शहरांतील प्रदूषणावर होताना दिसतोय. याचा मोठा फटका पुणेकरांना बसला असून पुणे शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठल्याचे दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरात (Pune) मागील काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीला सुरूवात झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले, ज्याचा थेट परिणाम शहरातील वातावरणावर झाला आहे. पुण्यातील एअर क्वालिटी इंडेक्स 150 वरून थेट 263 वर पोहचल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

पुणे महानगरपालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य प्रदूषण नियामक महामंडळाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेकडून बांधकाम व्यवसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कामाच्या ठिकाणी धुळीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती या नोटीसांमार्फत घेण्यात येणार आहे. दरम्यान, हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिकाही अनेक उपाययोजना राबवत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी शहरात गर्दीच्या चौकांमध्ये लवकरच मिस्ट बेसड् फाउंटन उभारण्यात येणार आहेत.

इतर शहरांमधील हवा प्रदुषणाची काय परिस्थिती?

(सकाळी ८ वाजता)

अकोला - १५० (पीएम १० प्रदूषक मात्रा अधिक)

अमरावती - १०६ (पीएम १० प्रदूषक मात्रा अधिक)

संभाजीनगर - १५४ (पीएम १० प्रदूषक मात्रा अधिक)

चंद्रपूर - २५६ (पीएम २.५ प्रदूषकाची मात्रा अधिक)

जळगाव - १५३ (पीएम २.५ ची मात्रा अधिक)

कोल्हापूर - १८७ (पीएम १०)

नागपूर - २३६ (पीएम २.५)

नाशिक - १६७ (पीएम २.५)

मुंबई - १९५ (पीएम २.५)

नवी मुंबई - २६० (पीएम १०)

पुणे - १५९ (पीएम २.५)

सोलापूर - ३०१ (पीएम २.५)

ठाणे - २२६ (पीएम १०)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT