Pune Viral Video: Saamtv
मुंबई/पुणे

Pune Viral Video: आत्महत्येचा प्रयत्न... तरुणाने थेट चौथ्या मजल्यावरुन मारली उडी, अग्निशमन जवानांनी हवेतचं झेललं; थरारक VIDEO

Pune Latest News: अग्निशमन जवानांनी युवकाला वरच्या वर हवेत झेलून अक्षरशः मृत्यूलाही परतवून लावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी

Pune News:

देव तारी त्याला कोण मारी.. असे म्हणतात ते खोटं नाही. असाच थरारक अनुभव आज पुणेकरांना पाहायला मिळाला. शहरातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज परिसरात एका नेपाळी तरुणाने आत्महत्या करण्यासाठी ४ थ्या मजल्यावरुन उडी मारली. यावेळी पोलिस आणि अग्निशमन जवानांनी युवकाला वरच्या वर हवेत झेलून अक्षरशः मृत्यूलाही परतवून लावले. पोलिस आणि अग्नीशमन जवानांनी केलेल्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक सर्वत्र होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे, विवेक पारखी, (वय २१ वर्षे, रा. मूळगाव नेपाळ) या तरुणाने गुरुवारी (दि.५ ऑक्टोंबर) सकाळी आठ वाजता अंबर ग्रीन सोसायटी, सिंहगड काँलेज कँपस येथील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी पोलीस तसेच अग्निशमन जवानांना याबाबतची माहिती दिली. बचाव पथकाने तरुणाला वाचवण्यासाठी खाली जाळी टाकण्यास सुरूवात केली. परंतु त्याआधीच युवकाने थेट चौथ्या मजल्यावरील टेरेसवरुन खाली उडी घेतली. तरुणाने उडी मारताच अग्रिशमन जवानांनी प्रसंगावधान राखत त्याला थेट हवेतच झेलले.

अगदी काही क्षणात घडलेली ही घटना अन् जवानांनी दाखवलेल्या भीमपराक्रमामुळे त्या मुलाचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सुमारे दीड तास चाललेल्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

SCROLL FOR NEXT