Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSaamtv

Aditya Thackeray News: 'निर्लज्जपणाचा कळस...' तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे भडकले; नेमकं काय घडलं?

Nanded Hospital Death: शिंदे- फडणवीस- पवार सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तिन तेरा वाजल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Published on

Aditya Thackeray News:

नांदेड शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे- फडणवीस- पवार सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तिन तेरा वाजल्याचा आरोप करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर तानाजी सावंत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड शासकीय रुग्णालयातील (Nanded Government Hospital) ३१ रुग्णांचे बळी गेल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका होत आहे. नांदेड प्रमाणेच, छत्रपती संभाजीनगर (Ghati Hospital) आणि नागपूरमधील (Nagpur) रुग्णालयांमध्येही असेच प्रकार घडल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नांदेडमध्ये जे घडले ती मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या याच वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

Aditya Thackeray News
Prakash Ambedkar :'वंचित'ला 'इंडिया आघाडी'त घेतले नाही तर माेदी... ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"निर्लज्जपणाचा कळस! आरोग्यमंत्री म्हणताएत की सगळंच कॅबिनेट जबाबदार आहे, मग द्या राजीनामा! असल्या पळपुट्या भूमिकेमुळे आणि घाणेरड्या राजकारणामुळे आपलं राज्य मागे जात आहे... असे ट्वीट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com