Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे कोयता हल्ला प्रकरणात आरोपीस ३ महिन्यानंतर जामीन मंजूर; धाडसी तरुणांमुळे वाचला होता तरुणीचा जीव

Pune Latest News: सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले होते. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Crime News:

तीन महिन्यांपूर्वी पुणे शहरात महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. शहरातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले होते. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. या प्रकरणी आता महत्वाची बातमी समोर आली असून हल्ला करणाऱ्या आरोपीला जामीन मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २७ जून रोजी सदशिव पेठेतील (Sadashiv Peth) पेरुगेट पोलिस चौकीजवळ महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रेम संबंधास नकार दिल्याने आरोपी शंतनू जाधव याने तरुणीवर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सुदैवान दोन धाडसी तरुणांमुळे या मुलीचा जीव वाचला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. शहरात मुलींवर भरदिवसा हल्ले होत असल्याने नागरिकांमधूनही तीव्र संताप पसरला होता. या प्रकरणी शंतून लक्ष्मण जाधव या तरुणास अटक करण्यात आली होती. (Pune Crime)

दरम्यान चार महिन्यानंतर आरोपी लक्ष्मण जाधव यास जामीन मंजूर झाला आहे. तपास अधिकारी बोलवतील त्यावेळी तपासास हजर राहणे, सात दिवसांत पासपोर्ट जमा करणे, या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Masala Peanuts : कुरकुरीत मसाला शेंगदाणे घरी कसे बनवायचे? वाचा एकदम सोपी रेसिपी

Actress Casting Couch: 'पुरुषांची पार्टी आहे, एकटी ये...'; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे सुपरस्टार हिरोने केली नको ती मागणी

Maharashtra Live News Update: महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर हल्ला

Brain Stroke Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? 'ही' लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Central Railway : मुंबईतील लोको पायलटचा मोठा निर्णय, सामूहिक स्वेच्छानिवृत्ती घेणार, पण कारण काय ?

SCROLL FOR NEXT