Pune Crime News
Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : मित्रांसोबत मौजमस्ती करायला रिसॉर्टवर गेला; तिथेच मृत्युने गाठलं, तरुणासोबत घडली भयानक घटना

Prachee kulkarni

Pune Crime News : पुण्यातील वेल्हे तालुक्यातून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक सवॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (७ एप्रिल) रोजी घडली. दरम्यान पाण्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मिळून आला. (Breaking Marathi News)

मोहीम हेमंत सराफ (वय .३०) राहणार घर नं. ६९ लक्ष्मीगल्ली कुठीर,लक्ष्मीपुरा वार्ड सागर राज्य मध्यप्रदेश असे युवकाचे असून तो बाणेर येथील एका खासगी कंपनीच्या मीटिंगसाठी पुण्यात आला होता. याबाबत निखिल किशोर बडगुजर (वय. २४) वर्ष भोसरी प्राधिकरण या अभियंत्याने वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाेलिसांनी (Police) सांगितले की, ३ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी दुपारी दोन पर्यंत एका खासगी कंपनीची मीटिंग बाणेर, पुणे येथील अमर सदानंद टेक्नॉलॉजी पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंगसाठी कंपनीच्या संपूर्ण भारतातील कामगार उपस्थित होते.

शुक्रवारी ७ एप्रिल दुपारी ३ वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले व मुली यांचा ग्रुप पानशेत परिसरातील धिंडली (ता. वेल्हे) येथील एका रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले. रिसोर्ट फिरल्यानंतर सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले.

धरणाच्या बॅंकवॅाटरच्या पाण्यात गुडगाभर पाण्यात सर्वजण गेले, यावेळी मोहीम सराफ याचा पाय घसरुन खोल पाण्यात पडला. त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील यावेळी पाण्यात पडला. परंतू जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. यावेळी मोहीतला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहीतला पाण्यातून वर काढण्याचा खूप प्रयत्न केला.

मात्र, मोहीत हा खोल पाण्यात बुडाला. हजर असलेल्यांपैकी कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. घडलेला प्रकार स्थानिक ग्रामस्थ, रिसोर्टचे मालक आणि पोलिसांना कळताच त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे मदत मागवली.

घटनेची माहिती मिळताच मुळशी (Pune News) आपत्ती व्यवस्थापन समिती रवाना करण्यात आली. रात्री अंधार असल्याने कामात अडथळे येत होते. तेव्हा आज सकाळी दिवस उजडता पुन्हा कामाला सुरूवात करण्यात आली. १४ तासानंतर मोहीत सराफ याचा मृतदेह मिळून आला. यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मोलाचे सहकार्य केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT