Pune New Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune New Metro: पुणेकरांना अजून एक नवी मेट्रो मिळणार! मे महिन्यात होणार सुरु; वाचा सविस्तर

Pune Metro Starting in May: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुणेकरांसाठी आणखी एक मेट्रो सुरु होणार आहे. मे महिन्यात पुण्यात नवीन मेट्रो सुरु केली जाणार आहे.

Siddhi Hande

पुणे मेट्रोचा विस्तार होणार

पुण्यात २०० किलोमीटपर्यंतच मेट्रोचा विस्तार करणार-मुख्यमंत्री

पुण्यात आणखी एक नवी मेट्रो सुरु होणार

मे महिन्यात पुण्याला नवीन मेट्रो मिळणार

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच पुण्याला आणखी एक नवीन मेट्रो मिळणार आहे. येत्या मे महिन्यात १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावणार आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास खूप जलद होणार आहे. याचसोबत पुण्यात २०० किमीचे जाळे उभारणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

२०० किलोमीटरपर्यंत मेट्रो धावणार

काल पुणे मेट्रो भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाले. याचवेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश आहे. या संपूर्ण भागात २०० किमीची मेट्रो सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील नागरी विकासाचा विचार करुन पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे.

पुण्यातील या मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. पुणे मेट्रोतून रोज अडीच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. यानंतर मेट्रोचा पुढचा मार्ग सुरु झाल्यानंतर अजूनच फायदा होणार आहे. पुण्यातील मेट्रोचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे उशिरा सुरु झाले. मात्र, गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने प्रकल्प पूर्ण करण्यात आला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

पुणे शहरात ३३ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरु आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात होणार आहे तर उर्वरित ११ किलोमीटरचा मार्ग जुलै महिन्यात सुरु होणार आहे.

सध्याचा मेट्रोचा ३३ किलोमीटरचा मार्ग आणि नवीन मार्ग मिळून एकूण ५६ किलोमीटरपर्यंत मेट्रो धावणाप आहे. याचसोबत आणखी ५५ किलोमीटर मेट्रोचे काम सुरु आहे. ८० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. मेट्रोचा २०० किलोमीटरपर्यंतचा विस्तार करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे पिवळं रेशन कार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Shocking: लैंगिक विकृतीतून तरुणाने गुदाशयात घुसवली पाण्याची बाटली, ३६ तास असह्य वेदना, १ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर वाचले प्राण

Maharashtra Live News Update : डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला फक्त ५ मिनिटांत नेसा नऊवारी साडी; 'ही' घ्या सोपी ट्रिक, सर्वात सुंदर दिसेल तुमचा मराठमोळा लूक

Backless Blouse Designs: लग्नात सुंदर दिसण्यासाठी ओपन बॅक स्टाईल ब्लाऊज, नवरीचा लूक दिसले भारी

SCROLL FOR NEXT