Why are teenagers joining gangs in Pune : पुण्यात गुन्हेगारी आता नवीन नाही...मात्र या गुन्हेगारीचा नवा पॅटर्न सर्वांना धक्का देणार आहे....पुण्यातल्या गँगवॉरमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश दिवसेंदिवस वाढत चाललाय...हे कशामुळे घडतंय?याला कोण जबाबदार आहे? जाणून घेऊया या रिपोर्ट मधून... (Pune crime rate 2025 report on minors)
पुण्यातील गुन्हेगारी आता राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ड्रग्जची तस्करी, कोयता गँगची दहशत ते दिवसाढवळ्या हत्यांच्या सत्रामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. यातून एक धक्कादायक वास्तवही समोर आलंय. अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले असल्याचं तपासातून समोर आलंय. आंदेकर-कोमकर टोळी युद्धात ज्या हत्या झाल्यात त्यामध्ये अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे.
2 ऑक्टोबर 2023
पुण्यातल्या गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीच्या निखिल आखाडेची हत्या करण्यात आली. या हत्येतले दोन आरोपी फक्त 17 वर्षांचे होते.
1 सप्टेंबर 2024
माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली. हत्येतल्या 21 आरोपींपैकी 1 आरोपी अल्पवयीन, तर बाकीचे आरोपी 19 आणि 20 वर्षांचे होते.
4 सप्टेंबर 2025
आयुष कोमकर हत्येतही एक आरोपी अल्पवयीन
1 नोव्हेंबर 2025
कोंढव्यात गणेश काळेच्या हत्येतील दोन मारेकरीही अल्पवयीन होते
4 नोव्हेंबर 2025
ताजी घटना म्हणजे पुण्यातील बाजीराव रोडवर मयंक खरारे या 17वर्षांच्या मुलाची भर चौकात हत्या करण्यात आलीये. या गुन्ह्यातील तीनही आरोपी अल्पवयीन आहेत.
18 वर्षांखालील मुलांवर बालगुन्हेगार न्याय कायदा 2015 नुसार कारवाई होते. गुन्ह्यांमध्ये मुलांचा वाढता सहभाग हे पुणे पोलिसांसमोर मोठ आव्हान आहे. किरकोळ कारणातून भांडणं, वाहनांची तोडफोड, धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवणे... हाच अल्पवयीन गुन्हेगारीचा पॅटर्न बनला आहे. 'भाईगिरी' दाखवून, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून प्रसिद्ध हाव या मुलांमध्ये वाढलीय. पाहूयात गेल्या चार वर्षांतील अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी...
वर्ष: 2021
गुन्ह्यांची संख्या: 336
आरोपींची संख्या: 519
वर्ष: 2022
गुन्ह्यांची संख्या: 342
आरोपींची संख्या: 544
वर्ष: 2023
गुन्ह्यांची संख्या: 293
आरोपींची संख्या: 435
वर्ष: 2024
गुन्ह्यांची संख्या: 303
आरोपींची संख्या: 514
वर्ष: 2025 (ऑक्टोबर महिन्यापर्यंत)
गुन्ह्यांची संख्या: 149
आरोपींची संख्या: 232
गुन्हेगारीच्या या जाळ्यात अडकत चाललेल्या या कळ्यांना वाचवायचं कसं? हा एक मोठा प्रश्न आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी, सायबर सिटी असलेल्या पुणे शहराला लागलेली गुन्हेगारीची किड आता अल्पवयीनांचं आयुष्य उद्धव्स्त करतेय. त्यामुळे याचा समूळ नायनाट करण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.