Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : ८ जणांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी 'तिरडी' आंदोलन, नवले पुलावर पुणेकरांचा आक्रोश!

Pune Navale Bridge Accident Death : नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तिरडी आंदोलन झाले. मागील ८ वर्षात २१० अपघातात ८२ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

Alisha Khedekar

नवले पुलावर वाढत्या अपघातांचा निषेध करत पुण्यात तिरडी आंदोलन पार पडले

मागील ८ वर्षात या भागात २१० अपघातांमध्ये ८२ जण मृत्यूमुखी पडले आहेत

सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली

रस्त्यांवरील दोष दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे मागणी

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ८ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. तसेच १५ जण जखमी झाले. मागील ८ वर्षात नवले पुलावर २१० अपघात घडले ज्यात ८२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांचा निषेध करण्यासाठी पुण्यात तिरडी आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

पुण्यातील नवले पुलावर मागील ८ वर्षात २१० अपघात घडले ज्यात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय काल या परिसरात भीषण अपघात झाला या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान परिसरात वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेमुळे संतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे यांनी प्रशासनाविरोधात अनोखे “तिरडी आंदोलन” करून शासनाचा निषेध नोंदवला. अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतीकात्मक आयोजन करून नागरिकांसह त्यांनी शासनाला जाग देण्याचा प्रयत्न केला.

अलीकडच्या अपघातात लहान मुलीसह कुटुंबाची झालेली होरपळ पाहून मोरे भावुक झाले. मोरे म्हणाले, “या भागात मृत्यूंची मालिका सुरू आहे. प्रशासन काहीच करत नाही. असेच चालू राहिले तर लोकांना जगण्यापेक्षा आत्महत्या करावीशी वाटेल,” अशी वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केली. जय हरी वडगाव आणि आसपासचे नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत.

मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जवळपास १ तास सातारा–मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली होती. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना कराव्यात, रस्त्यांची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे की, “शासनाचे अधिकारी पाहणी करून जातात, आश्वासने देतात… पण बदल काहीच होत नाही. आमचे जीव गेले तरी प्रशासन जागे होत नाही. तुम्ही केलेल्या मदतीने ते जीव पुन्हा येणार नाही त्यामुळे भविष्यात अशा बदलून येण्यासाठी आपण उपाययोजना करणे गरजेचे आहे”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit pawar : शरद पवारांसोबत युती करायचीच, आता अजित पवार स्वत: मैदानात उतरले; राष्ट्रवादीतील मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज महाडिक यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज

Sleeveless Blouse Designs: स्लिव्हलेस ब्लाऊजची हटके स्टाईल, या 5 लेटेस्ट डिझाईन्स तुम्हाला उठून दिसतील

2025 Bollywood Songs : न्यू ईअर सेलिब्रेशन करण्यासाठी, 2025 मधील 'हि' सुपरहिट बॉलिवूड साँग एकदा लावाच

Veg Cutlet Recipe: न्यू ईअर पार्टीसाठी बनवा चविष्ट व्हेज कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT