Pune-Nashik Highway Shiroli Women Accident
Pune-Nashik Highway Shiroli Women Accident Saam TV
मुंबई/पुणे

Shiroli Accident : आम्ही जोरजोरात रडत होतो, मदतीसाठी ओरडत होतो; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार

रोहिदास गाडगे

Pune-Nashik Highway Shiroli Women Accident : पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत प्रत्यक्षदर्शीनी थरार सांगितला आहे. (Pune Nashik Highway)

आम्ही लग्नातून स्वयंपाकाचे काम उरकून घरी परतत होतो. मध्यरात्र असल्याने अंधार होता. सर्व महिला एकापाठोपाठ एक रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी समोरून एक भरधाव गाडी आली काही कळण्याच्या आतच ती महिलांना उडवत उडवत गेली. आम्ही बायकांना मागे ओढत होतो, असं अपघातातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितलं.

अपघातानंतर आमच्या साथीदार महिला रस्त्यावर पडल्या होत्या आम्ही जोरजोरात रडत होतो. मदत मिळावी यासाठी ओरडत होतो. १० ते २० मिनिटं आम्हाला मदत मिळाली नाही. थोड्या वेळानंतर आम्हाला मदत मिळाली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या. त्यानंतर जखमी झालेल्या महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. अपघातानंतर पोलिसांनी (Police) आम्हाला खूपच धीर दिला. त्यांनी आमचं सात्वन केलं आम्हाला पाणी दिलं घाबरू नका असं सांगितलं. असंही प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितलं. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. दरम्यान, पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला. तर १२ महिला गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाला. अजूनही १४ महिलांवर उपचार सुरू असून यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मध्यरात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा ओरडा झाला. रस्त्यावर रक्ताची थारोळी साचली. अपघातग्रस्त महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने १७ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

SCROLL FOR NEXT