पुणे : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यातही (Pune) सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुठा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. अशातच पुण्यात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एक मोठी घटना घडली. मुठा नदीची पाणीपातळी वाढल्याने पुलावरून जाणारी एक कार पाण्यात अचानक वाहून जाऊ लागली. या कारमध्ये ५ जण होते. (Pune Todays News)
कार वाहून जात असल्याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निश्मन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत कारमधील सर्व ५ जणांना वाचवलं. अग्निशमन दलाने वेळेवर बचावकार्य केल्यानं पाचही जणांचे प्राण वाचले. कारमध्ये २ महिला आणि ३ पुरूषांचा समावेश होता.
वऺचिका लाल वाणी (वय १३) प्रिया लाल वाणी (वय २२) कुणाल लाल वाणी (वय २८) कपिल लाल वाणी वय (२१) आणि कृष्णा लाल वाणी (वय ०८) या एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा जीव वाचला आहे. अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्वर खेडेकर व जवान किशीर बने, दिलीप घडशी, संदिप कार्ले यांनी विषेश कामगिरी बजावली. (Pune Latest Marathi News)
गुरूवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एस एम जोशी पुला खालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. एरऺडवणा केंद्राची मदत पोहचताच दलाच्या जवानांनी रोप, लाईफ जॅकेट च्या साह्याने नदी पात्रात उतरून कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांची सुखरूप सुटका केली.
अधिक माहिती घेतली असता सदर गाडी आणि गाडीतील व्यक्ती मूळच्या पालघर येथील असून ते पुण्यात नातेवाईकांकडे आले होते.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.