Girish Mahajan: थोडं शांत रहा...तू-तू, मैं-मैं करू नका; गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाजन पहिल्यांदा जळगावात आले यावेळी ते बोलत होते.
Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan Eknath KhadseSaam Tv

जळगाव - एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तब्बल 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळं शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि अखेर भाजप (BJP) आणि शिंदे गटाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शिंदे-फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापर्यंत या सर्वांना खातं वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

अशातच मंत्रिमंडळात पहिल्याच विस्तारात स्थान देण्यात आलेल्या भाजपच्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाजन पहिल्यांदा जळगावात आले यावेळी ते बोलत होते.

हे देखील पाहा -

गुलाबराव पाटील, मी स्वतः ओबीसी आहोत, त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही आहेत म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही, आपण थोडं शांत रहा, तू तू मै मै करू नका असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला नक्कीच उशीर झाला आहे. मात्र, आता खाते वाटपला उशीर होणार नाही. खाते वाटप लवकरच होणार आहे. 17 ऑगस्टला अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी खाते वाटप होऊ शकते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच योग्य निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

Girish Mahajan Eknath Khadse
Mumbai Pune News : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली; रेल्वेची वाहतूक खोळबली

यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंबाबत विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडे कुठे नाराज आहेत, असं मला वाटतं नाही. त्यांना मोठं पद मिळेल, पक्षश्रेष्ठी विचार करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर थोडीफार नाराजी असतेच मग ते एका पक्षाचे सरकार असलं तरी असतेच, थोडे दिवस ही नाराजी असते असे देखील ते यावेळी म्हणाले.

मागच्या सरकारमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री मंत्रालयात आले नाही, त्यांनी ऑनलाईन सरकार चालवलं, ते आमदारांना भेटले नाहीत मंत्र्यांना भेटले नाहीत जनता तर दूरच राहिली त्यामुळे राज्यात अनेक प्रश्न रखडले आहेत. गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता, विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे, आता डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com