VIDEO : पुण्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; नागरिकाला बंद खोलीत लाथा बुक्यांनी मारहाण

पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Pune Police Rajesh Puranik Viral Video
Pune Police Rajesh Puranik Viral VideoSaam TV

पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली. पुणे पोलिसांनी दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Police) राजेश पुराणिक यांचा पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पुराणिक हे बंद खोलीत एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. (Pune Police Inspector Rajesh Puranik Viral Video)

Pune Police Rajesh Puranik Viral Video
तंगडं तोडून टाकीन समजलं का..., पुण्यात महिला पोलिसाकडून हमालाला मारहाण, पाहा VIDEO

पुराणिक यांच्याविरोधात यापूर्वी सुद्धा अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे त्या पोहचल्या सुद्धा आहेत. मात्र, असं असून सुद्धा आयुक्त अमिताभ गुप्ता हे गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ पुराणिक हे बंद खोलीत एका नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचं दिसून येत आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील राजेश पुराणिक यांनी हॉटेलमध्ये कारवाई करत असताना तरुणांना व कामगाराना मारहाण केल्याचं समोर आलं होतं. तर महिला पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तरी सुद्धा पुराणिक यांची ही मुजोरी सुरूच आहे. (Pune Police Viral Video)

महिला पोलिसाकडून हमालाला मारहाण

पुण्यात रक्षबंधनाच्या दिवशीच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे हा सर्व प्रकार बुधवारी सांयकाळी ५ वाजता उरुळी कांचन भागात असणाऱ्या शिंदवने रस्त्यावर घडला. भारती होले असं मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्या उरुळी कांचन पोलीस चौकीत कार्यरत आहेत.

तर किशोर निवृत्ती गरड असे मारहाण झालेल्या हमालाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शिंदवने रस्त्यावर एका किराणा दुकानात किराणा माल उतरवत असताना, अचानक तिथे भारती होले आल्या आणि त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. असा आरोप किशोर गरड यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com