Pune Municipal Coopration News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणे महानगरपालिकेत थरार, अधिकाऱ्याने टाळाटाळ केली, तरुणाने डोक्याला बंदूक लावली अन्...

Pune Municipal Coopration News : पुणे महापालिकेत तरुणाने डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून आत्महत्येची धमकी दिली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुणे महापालिकेच्या कर विभागात आत्महत्येची धमकी

  • बिल निघत नसल्याचा अधिकाऱ्यांवर आरोप

  • रिव्हॉल्व्हर डोक्याला लावत तणावपूर्ण वातावरण

  • कोणतीही अनुचित घटना घडली नाही

  • पोलिसांकडून तपास सुरू

अक्षय बडवे, पुणे

Pune Municipal Corporation Tax Department News पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेत एकाने कर संकलन विभागाकडून आपलं बिल निघत नसल्याने, रिव्हॉल्व्हर काढून आत्महत्येची धमकी दिली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागातील एका रहिवाशाने आज महापालिकेच्या कर संकलन विभागामध्ये स्वतःच्या डोक्याला पिस्तूल लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून कर विभागात खेट्या मारत होता.

त्याचा कर भरून घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्याने केला. आज अभय योजनेचा अखेरचा दिवस होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पालिकेत सतत चकरा मारत त्याने त्याचे बिल काढण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते.

मात्र अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आज हताश झालेल्या या व्यक्तीने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर काढून स्वतःच्या डोक्याला लावत आत्महत्या करण्याची धमकी दिली. आता त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर कुठून आले? त्याचा परवाना आहे का याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मोदी सरकारला हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये बेकायदेशीर गावठी दारू वाहतुकीवर धडक कारवाई

भाजपच्या दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Phone Battery Damage: फास्ट चार्जिंग होणाऱ्या फोनची बॅटरी लगेच खराब होते का? वाचा सत्य

Shocking : नवरा नाईट ड्युटीवर, घरी सासऱ्याकडून सुनेचा लैंगिक छळ ; खुलताबादमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT